esakal | खळबळजनक घटना! मित्रासोबत झालेल्या वादात तरुणाची चाकूने भोसकून खून

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

खळबळजनक घटना! मित्रासोबत झालेल्या वादात तरुणाची चाकूने भोसकून खून

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना मयूर पार्क भागात एसबीओए शाळेसमोर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यश महेंद्रकर (वय २१, नवजीवन कॉलनी, एन १२ हडको) असे मृताचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यश महेंद्रकर हा त्याच्या मित्रासोबत बोलत उभा होता. वादावादीत सोबत असलेल्या साथीदाराने यशच्या छातीत चाकूने वार केला. वार केल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यशला गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सिडको आणि हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलाला संशयावरून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्री अकरा वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन तपासणी सुरू केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळावर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यश महेंद्रकर याची हत्या नेमक्या कोणत्या कारणाने झाली, हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.