esakal | धक्कादायक जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरु

बोलून बातमी शोधा

धक्कादायक जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरु
धक्कादायक जळालेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरु
sakal_logo
By
संतोष शेळके

करमाड (जि.औरंगाबाद) : जालना रोडलगत कुंभेफळ कमानी समोरच्या बाजूला मंगळवारी (ता.२०) सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत, करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील अंदाजे २० ते ३० वयोगटाच्या एका व्यक्तीस कोणीतरी मारून त्याची ओळख न पटण्याच्या उद्देशाने अर्धवट अवस्थेत जाळून फेकून दिले आहे. करमाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

अंगात फुल बाह्यांचा लाल रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅण्ट, गळ्यात चेन, डाव्या हातात लाल रंगाची घडी, कमरेला निळ्या रंगाचा पट्टा, लालसर रंगाची चप्पल अशा वर्णनाचा हा मृतदेह आढळून आला आहे. सदरील मृतदेहास कोणी ओळखत असल्यास करमाड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस (८८८८८२१५२५) किंवा पोलिस जमादार संदीप जाधव यांच्या (९८२३२९४२४६) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करमाड पोलिसांकडुन करण्यात आले आहे.