esakal | पैठण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांना अटक

बोलून बातमी शोधा

पैठण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांना अटक
पैठण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा, पाच जणांना अटक
sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ(जि.औरंगाबाद) : मोकळ्या जागेत झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली, तर एक जण फरार झाला. ही कारवाई पाचोड पोलिसांनी शनिवारी (ता.एक) दुपारी केली. या जुगाऱ्यांकडुन जुगार खेळण्याच्या साहित्यासह रोख ९ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचोड पोलिसांना शनिवारी आडुळ येथे काही जण एका शेतात मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाखाली पैसे लावुन झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

हेही वाचा: जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, खचून न जाता धीराने सामोरे जाण्याचा सल्ला

या आधार पोलिसांनी सापळा रचून शनिवारी दुपारी या अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळत असलेल्या वकिल चाँदमिया शेख (वय ३०), पाशु चाँद शेख (३६), अर्जुन सुरमाजी बनकर (३०), प्रविण नानाराव बनकर (३८, सर्व रा.आडुळ बु), विष्णू जनार्दन गोर्डे (३४, रा.रजापुर) यांना अटक करण्यात आली, तर एक जण फरार झाला. ही कारवाई पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, रविंद्र क्षिरसागर, विश्वजित धन्वे, श्री. फोलाने, श्री. मुळे, श्री.जारवाल, श्री. पाटेकर यांनी केली.