Chhatrapati Sambhajinagar: सराफा व्यावसायिकाला चाकू दाखवत लुटले;तीन सराईत आरोपींना बेड्या, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarafa Businessman Robbed in Ambhai Ghat: अंभई घाटात सराफा व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या तिघा सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: अंभई घाटात सराफा व्यावसायिकाला अडवून चाकूचा धाक दाखवत सोने- चांदी व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघा सराईतांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आरोपींकडून गावठी कट्टा, दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा ६ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दत्ता सुनील राऊत (रा. मुकुंदवाडी), रोशन ऊर्फ सोनू कैलास सुरडकर (रा. बिडकीन ) आणि लखन शालिग्राम सूर्यवंशी (रा. बुलढाणा) अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com