esakal | दुकानमालकांना अटक, बनावट स्पेरअरपार्ट विक्री करणे भोवले
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट वाहन परवाने बनवणाऱ्या दोघांना अटक

दुकानमालकांना अटक, बनावट स्पेरअरपार्ट विक्री करणे भोवले

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : नामांकित कंपनीच्या कारचे बनावट स्पेअरपार्ट विक्री Car Fake Sparepart Selling करणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांनी कारवाई करुन २४ हजार पाचशे रुपयांचे बनावट स्पेअर पार्ट जप्त केले होते. ही कारवाई १९ जून रोजी जालना रोडवरील अपना बाजार कॉम्पलेक्समध्ये करण्यात आली होती. या गुन्‍ह्यात Aurangabad दोघा दुकानमालकांना मंगळवारी (ता.सहा) सकाळी बेड्या ठोकल्या. कार डेकोर शॉपचा मालक गुरमितसिंग कर्नलसिंग बिंद्रा (५५, रा. एन-१ सिडको) आणि सेवा ऑटोमोबाइल शॉपचा मालक अमित प्रेमचंद जैन (४८, रा. अहिंसानगर, आकाशवाणी) अशी अटक करण्‍यात आलेल्यांची नावे आहेत. जालना रस्त्यावरील अपना बाजार कॉम्पलेक्समध्ये गुरूमितसिंग बिंद्रा आणि अमित जैन यांच्या दुकानातून ह्युंदई कारचे बनावट स्पेअर पार्ट विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रेवणनाथ विष्णू केकाण (३९, रा. हडपसर, पुणे) यांना मिळाली होती.aurangabad crime news shop owners arrested for selling car's fake spareparts

हेही वाचा: नांदेडकरांना दिलासा! दिवसभरात फक्त नऊ जण कोरोनाबाधित

त्यावरुन केकाण यांनी जवाहरनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने कार डेकोरेटर्स शॉप आणि सेवा ऑटोमोबाईल या दुकानांवर छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी ह्युंदाई कंपनीचे बनावट ऑईल सील, ऑईल कुलंट, हेडलाईट स्वीच असेंबली, ऑल वॉकर, टि.पी. सेंसर जप्त केले. तसेच किसा कंपनीचे कॅप व्हॅल्यू, ग्लास रबर सेट आदी २५ हजार पाचशे रुपयांचे साहित्य जप्त केले. या दोन्ही दुकानदारांविरुध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा आरोपी दुकानमालकांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, दोघां संशयितांना गुरुवारपर्यंत (ता.८) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.डी. सृंगारे-तांबडे यांनी दिले. सुनावणी दरम्यान सहायक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

loading image