esakal | नांदेडकरांना दिलासा! दिवसभरात फक्त नऊ जण कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेडकरांना दिलासा! दिवसभरात फक्त नऊ जण कोरोनाबाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात Nanded मंगळवारी (ता.सहा) प्राप्त झालेल्या दोन हजार २४६ अहवालांपैकी नऊ अहवाल कोरोनाबाधित Corona आले आहेत. आजच्या घडीला ६७ रुग्ण उपचार घेत असून एक बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे. दिवसभरात एकही मृत्यू झाला नसून २० कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ९१ हजार २८६ एवढी झाली असून यातील ८८ हजार ७१७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार ९०६ एवढी आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्के आहे. nanded corona updates covid numbers decline

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे RTPCR Corona Test नांदेड महापालिकेत Nanded Municipal Corporation दोन, हदगावला तीन, भैसा येथील एक, तर ॲन्टीजेन तपासणीद्वारे मुखेडला एक, हिमायतनगरला एक, हिंगोलीला एक असे एकूण नऊ बाधित आढळले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १२६, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे १३९ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा: पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

नांदेड कोरोना मीटर

एकुण स्वॅब - ६ लाख २० हजार २८

एकुण निगेटिव्ह - ५ लाख १६ हजार ९९३

एकुण पॉझिटिव्ह - ९१ हजार २८६

एकूण बरे - ८८ हजार ७१७

एकुण मृत्यू - एक हजार ९०६

--

मंगळवारी बाधित - नऊ

मंगळवारी बरे - २०

मंगळवारी मृत्यू - शून्य

प्रलंबित स्वॅब - ७८

उपचार सुरू - ६७

अतिगंभीर प्रकृती - एक

loading image