esakal | माजी उपसरपंचाचा खून, तिघा आरोपींना चार दिवस पोलिस कोठडी

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

माजी उपसरपंचाचा खून, तिघा आरोपींना चार दिवस पोलिस कोठडी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील गाढेगाव पैठण (Paithan) शिवारातील ब्रह्मगव्हाण एमआयडीसी पंपहाऊस रोडवर माजी उपसरपंचाच्या खुन प्रकरणातील तीन आरोपींना पैठण न्यायालयाने (Paithan Court) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शेती व राजकीय वलयाच्या पूर्ववैमनस्यातून रविवार (ता.दोन) रात्री गाढेगाव शेतवस्ती जवळील वाळुज औद्योगिक वसाहतीला (Waluj MIDC) पाणीपुरवठा करणारी ब्रह्मगव्हाण जलवाहिनी रोडवर माजी उपसंरपच तथा शेतकरी कांता शिंदे यांचा तीन तरुण आरोपींनी कमरपट्टा, लाकडाने बेदम मारहाण करून खुन केला होता.(Aurangabad Crime News Three Accused Get Police Custody In Murder Paithan)

हेही वाचा: बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

सोमवारी (ता.तीन) सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर काही तासातच बिडकीन पोलिस व गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपी अनिल केदारे, संजय केदारे, राजेश केदारे यांना अटक केली होती. मंगळवारी (ता.चार) बिडकीन ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी पैठण न्यायालयात तीन आरोपींना हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.सात) पोलिस कोठडी सुनावली. यावेळी सरकारी वकील श्री धोगडे,यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली असल्याचे माहिती बिडकीन पोलिसांनी दिली. दरम्यान सोमवार (ता.तीन) सांयकाळी मृत कांता शिंदेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.