esakal | बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

बोलून बातमी शोधा

imtiyaz-jaleel

बंगालच्या निकालाने भाजपचा ग्राफ लागला उतरणीला : इम्तियाज जलील

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोणतीही निवडणूक राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असते. मात्र एमआयएमचे (AIMIM) पहिले प्राधान्य कोरोनापासून जनतेला वाचवण्याला होते. यामुळे आम्ही पश्‍चिम बंगालमध्ये फारसा प्रचार केला नाही. तिथल्या निकालाने भाजपच्या विजयाचा ग्राफ उतरणीला लागल्याचे दाखवून दिले असून पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल (West Bengal Election 2021) सर्वांसाठी आनंददायी आहे, असे मत एमआयएमचे प्रवक्ते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.तीन) झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, की बंगालच्या निवडणुकीत आम्ही सहभागी होणार होतो. (Imtiaz Jaleel Said Bengal Result Bring BJP Graph Come Down)

हेही वाचा: कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने पतीचा मृत्यू

मात्र, कोरोनामुळे आम्ही सहभागी झालो नाही. इकडे रुग्णांना सुविधा नसल्याने आम्ही त्यांच्या मदतीसाठी काम करत आहोत. आम्ही निवडणुकीपेक्षा कोविडला महत्त्व दिले. प्रधानमंत्री मोदी तिथे गेले त्यांनी प्रचार केला. आम्ही शेवटच्या क्षणी काही उमेदवार उभे केले. मात्र, आमचे वरिष्ठ नेते जाऊ शकले नाहीत. इकडे कोरोनामुळे लोकांचे हाल सुरू होते. बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर मिळत नव्हते. ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णलयात जाऊन आम्ही रुग्णांचे प्रश्न सोडविले. हाच मोदीजी आणि आमच्यात फरक असल्याचा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

हेही वाचा: आम्ही बेजबाबदार! कोरोनाबाधित रुग्ण मास्क काढून चक्क तोंडावर थुंकला

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर वचक राहिला पाहिजे. यासाठी काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतुद केली पाहिजे. जेणेकरून कोणी काळाबाजार करण्यासाठी धजावणार नाही. पोलिसांनी पेशंटचे नातेवाईक बनवून लोकांना पाठवुन काळाबाजार करणाऱ्यांना पकडावे, अशी सूचना केली. सध्या औरंगाबादमध्ये व्हेंटीलेटरची उपलब्धता भरपुर आहे. मात्र ते हातळण्यासाठी स्पेशालिस्टची गरज असते. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी १३० व्हेंटीलेटर ऑपरेट करू शकतील. एवढाच घाटीकडे स्टाफ असल्याचे सांगितले. खासगी रूग्णालयांना गरजेनुसार व्हेंटीलेटर देण्याला हरकत नाही. मात्र आपल्या जिल्ह्याच्या बाहेर व्हेंटीलेटर देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.