esakal | चक्क तलवारीने खाऊ घातला केक! बहाद्दरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बोलून बातमी शोधा

crime news Aurangabad

प्रकरणी दोघांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघां संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

चक्क तलवारीने खाऊ घातला केक! बहाद्दरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: तलवारीने केक कापल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत, मात्र जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चक्क तलवारीने केवळ केक कापलाच नाही तर तलवारीच्या टोकावर केक थापून वाढदिवस असणाऱ्याला खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा सोमवारी (ता.५) उघडकीस आला. याप्रकरणी दोघांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघां संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे अंमलदार मनोज राधेशाम अकोले यांनी फिर्याद दिली. संशयिताने बंदूकीसारखे शस्त्र हातात घेऊन एक व्हिडीओ बनवत तोही सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी महेंद्र रमेश अहीले (२७, रा. हनुमान नगर, गल्ली क्रं ०१,गारखेडा परिसर, ओंकार विष्णू चव्हाण, (२२, रा. हनुमान नगर, गल्ली क्र.३ गारखेडा परिसर) अशी त्या दोघांची नावे आहेत.

Aurangabad Lockdown: जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्व दुकाने आजपासून बंद

पोलिसांनी संशयित अहिले याच्या घरातून सोमवारी (ता.५) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सातशे रुपये किमतीची ८० सेंटीमीटर लांब लोखंडी तलवार आणि पिस्टलच्या आकाराचे फायबर आणि स्टीलचे कोटिंग असलेले अग्‍नीशस्त्र (लायटर) असा एकूण १२०० रुपयांचा ऐवज जप्त केले आहे. संशयिताने वाढदिवसाचा केक तलवारीने कापला आणि तलवारीच्या टोकावर केक फासत खाऊ घातल्याचे छायाचित्र तसेच अग्नीशस्त्रासारख्या शस्त्राने दहशत निर्माण होईल असा व्हिडीओ बनवत व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक एन. जी. गायके करत आहेत.