esakal | मोबाइलचे हप्ते थकले ते भरून टाक, असे म्हणताच महिलेला संताप अनावर धारदार वस्तूने केला एकाला जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात राजेश पावशे यांची पत्नी राणी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइलचे हप्ते थकले ते भरून टाक, असे म्हणताच महिलेला संताप अनावर धारदार वस्तूने केला एकाला जखमी

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : मोबाइलचे हप्ते थकल्याने ते राजेश पावशे याला भरण्यास सांगितले असता त्याच्या पत्नीने मुलाच्या खेळण्याची गाडी डोक्यात मारून तसेच धारदार वस्तूने पोटात व छातीवर मारल्याने एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता.१८) सायंकाळी रांजणगाव येथे घडली. संतोष रामविलास पवार (वय ३१) याने राजेश अशोक पावसे याला फायनान्सवर मोबाइल घेऊन दिला होता.

या मोबाइलचे हप्ते थकल्याने संतोष पवार हा गुरुवारी (ता.१८) सायंकाळी पावसे याच्या घरी गेला व म्हणाला की, मोबाइलचे हप्ते थकले ते भरून टाक. हे ऐकताच पावशे याची पत्नी राणी ही घरातून बाहेर आली व पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर. असे म्हणून शिवीगाळ करत लहान मुलांची खेळण्याची गाडी डोक्यावर मारली. त्यामुळे संतोष पवार खाली पडला. त्यानंतर तिने धारदार वस्तूने संतोष पवार याच्या पोटावर व छातीवर मारून जखमी केले. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात राजेश पावशे यांची पत्नी राणी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादन - गणेश पिटेकर

loading image