Aurangabad Crime : अश्लील संकेतस्थळासाठी मुलीचे फोटो केले व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime pornographic website Photo Of The Girl Viral social media
Aurangabad Crime : अश्लील संकेतस्थळासाठी मुलीचे फोटो केले व्हायरल

Aurangabad Crime : अश्लील संकेतस्थळासाठी मुलीचे फोटो केले व्हायरल

औरंगाबाद : अश्लील साईटसाठी अल्पवयीन मुलीचे फोटो (photo)वापरून ते सोशल मीडियावर (social media) व्‍हायरल करणाऱ्या तरुणाच्‍या सायबर ग्रामीण पोलिसांनी (Cyber Police) मंगळवारी‍ (ता.४) पहाटे मुसक्या आवळल्या. सिद्धार्थ कचरू वाघमारे (३३, रा. सिद्धार्थनगर, एन-१२, हडको) असे त्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा: नाशिक : अंध-अपंग दांपत्याच्या घरातही अंधार

प्रकरणात १४ वर्षीय मुलीच्‍या आईने फिर्याद दिली होती. त्‍यानुसार, चार ऑक्‍टोबर २०२१ रोजी फिर्यादी ही आपल्या कुटुंबासह बहिणीच्‍या घरी असताना सायंकाळी फिर्यादीला त्‍यांच्‍या चुलतभावाने व्‍हॉट्सअॅपवर फेसबुकवरील एका खात्‍याचा स्‍क्रीनशॉट पाठवला. त्‍यात फिर्यादीची १४ वर्षीय मुलीचे फोटो पोस्‍ट केलेले दिसले. तसेच फिर्यादीच्‍या भावाने फोनद्वारे माहिती दिली की, पीडितेचे फोटो सिद्धार्थ कचरू नावाच्‍या फेसबुक खात्‍याच्‍या वापरकर्त्‍याने पोस्‍ट केले असून त्‍या अकाउंटवर इतर महिलेंचे अश्लील हावभाव करणारे फोटो टाकून ‘व्हिडिओ देखने के लिए लिंक को क्लिक किजिए’ अशी पोस्‍ट शेअर केलेली आहे. प्रकरणात सायबर ग्रामीण पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

हेही वाचा: ‘चायनीज मांजा’ विक्रेत्यांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

असा लागला गळाला

सायबर पोलिसांनी तपास करून ईमेल आणि मोबाइलच्‍या आयपी अॅड्रेसवरून आरोपी सिद्धार्थ वाघमारे याला मंगळवारी (ता.४) बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपी सिद्धार्थची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी दिले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top