अंध-अपंग दांपत्याच्या घरातही अंधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blind and handicapped couple Darkness in house too Power outage
अंध-अपंग दांपत्याच्या घरातही अंधार

नाशिक : अंध-अपंग दांपत्याच्या घरातही अंधार

सिडको : आधीच देवाने अंध म्हणून जन्माला घातलं.... त्यातून जीवनाचा प्रकाश शोधत असताना अचानक कोरोनामुळे (Corona) आर्थिक परिस्थिती डबघाईस आली.. संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे पैसेही बंद झाले... त्यातच वीज बिल थकले म्हणून महावितरण (MSEDCL) कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी खंडित करून एक प्रकारे मेहरबानीच केली. त्यामुळे आधीच जीवनात अंधार अनुभवत असताना आता घरातही अंधार अनुभवायची वेळ एका अंध- अपंग दांपत्यावर आली आहे.

हेही वाचा: जळगाव : अखेरच्या दिवशी बोदवडमधील चार प्रभागांसाठी 25 अर्ज

सिडकोतील सदिच्छानगरमध्ये भास्कर नकली व छाया नकली हे दांपत्य जीवनाशी संघर्ष करून जगण्याची लढाई लढत आहेत. भास्कर यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तर पत्नी छाया या अपंग आहेत. त्यांना मुले नाहीत. त्यामुळे ते दोघेही एकमेकांचा सांभाळ करत जीवन जगत आहे. भास्कर यांना खुर्ची विणण्याची कला अवगत आहे. त्यावरच ते आपल्या जीवनाचा गाडा हाकत होते. परंतु, ऐन कोरोनाकाळात हा व्यवसाय लयास गेला. त्यामुळे त्यांचे जीवन जगणे असह्य झाले. कोरोनाकाळात त्यांनी शासनाच्या अन्न-धान्यावर जीवन काढले. शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मिळणारे मानधनही काही महिन्यापासून मिळालेले नाही. अनेक वेळा तहसील कार्यालयाच्या चकरा मारून मारून आता त्यांच्याकडे भाड्यालाही पैसे नाहीत. तेथील अधिकारी थातुरमातूर उत्तर देऊन त्यांना बाहेर काढून देतात.

हेही वाचा: ‘चायनीज मांजा’ विक्रेत्यांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याने त्यांना वीजबिल भरणेही मुश्कील झाले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज बिल भरले नाही म्हणून त्यांची वीज जोडणी खंडित करून एकप्रकारे त्यांच्यावर मेहरबानीच केली आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांच्या जीवनात असलेला अंधार आता त्यांना घरातही अनुभवायला बघायला मिळत आहे. बाळासाहेब घुगे व पिंटू काळे आदी सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. पैसे आल्यानंतर वीज बिल नक्की भरू तोपर्यंत लाइट सुरू ठेवावी, अशी कळकळीची विनंती या अंध -अपंग दांपत्याने केली आहे. या संदर्भात महावितरण अधिकारी एस. एल. धारराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात चौकशी करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top