Aurangabad : उसने पैसे देऊन अत्याचार; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Aurangabad : उसने पैसे देऊन अत्याचार; गुन्हा दाखल

वाळूजमहानगर : उसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून तरुणाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना जोगेश्वरी येथे घडली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (ता.१८) गुन्हा दाखल झाला.

तनवीर तस्लीम शेख (वय ३२, रा. जोगेश्वरी) असे आरोपीचे नाव आहे. वाळूज परिसरातील जोगेश्वरी (ता.गंगापूर) येथील २९ वर्षीय महिला वाळूजमध्ये एका इंजिनिअरिंग कंपनीत काम करते. तिचे लग्न झाले होते; परंतु पतीशी पटत नसल्याने ती विभक्त राहते. ऑक्टोबर २०२० मध्ये तिने तनवीर याच्याकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यामुळे तो पैशाच्या कारणावरून तिच्या घरी नेहमी येत होता. दरम्यान तो बळजबरीने तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता.

तसेच तिला दिलेल्या उसने पैशाच्या कारणावरून लगट करून तो नेहमी म्हणत असे की, मी तुला दिलेले उसने पैसे तू मला परत देऊ नको, तू माझ्या सोबत राहा. त्यानंतर एकेदिवशी तो तिच्या घरी आला व प्रेमाच्या गोष्टी करून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो नेहमी घरी येऊन तुझी समाजामध्ये बदनामी करेल, अशी धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

गुरुवारी (ता.१५) सप्टेंबर २०२२ रोजी रात्री १० वाजता ती एकटी असताना तो घरी आला व उसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून वाद करून बळजबरीने शारीरिक संबंध करू लागला. त्यास विरोध केला असता त्याने शिवीगाळ करून मारहाण केली व तू जर माझ्याविरुद्ध तक्रार केली तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (ता.१८) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गौतम वाबळे करीत आहे.

Web Title: Aurangabad Crime Young Man Abusing Woman Due To Money Midc Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..