औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crop loan distribution

औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेचा पुढाकार

वैजापूर : अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांना वारंवार सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांना कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु, बँकेच्या निकषांमुळे अनेक शेतकरी कर्जासाठी पात्र ठरत नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने आता अल्प मुदत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सोसायटीचे कर्जदार सभासद शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त २० टक्के पीककर्ज रकमेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे १२ कोटी ७३ लाखांची अतिरिक्त कर्ज रक्कमेचा लाभ २० हजार ११६ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

बँकेच्या शाखेतून आर्थिक रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना येथील मुख्य शाखेत एटीएम सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेच्या १५ शाखे मार्फत ११५ सोसायटीच्या २३ हजार ६०७ सभासदांना ७१ कोटी ७१ लाखाचे अल्पमुदतीचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी तीन हजार ४९१ शेतकऱ्यांचे कर्ज खाते थकबाकीत गेले. मात्र, यातील २० हजार ११६ कर्जदारांनी ६३ कोटी ६८ लाखांचे मुद्दल व व्याजाची परतफेड वेळेत केली. या क्रियाशील कर्जदार शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्ज खात्यात २० टक्के कर्ज रक्कम वाढण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने बाजार समिती संचालकांच्या निवडणुकीत विकास सोसायटी संचालकाऐवजी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे बॅंकेने पीककर्ज रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. दरम्यान, सोसायटीचे चेअरमन आणि गटसचिव यांच्याकडून मागणी आल्यानंतर कर्जदार सभासदांना कर्ज खाते नूतनीकरणावेळी दिलेली मुद्दल रक्कमेत वीस टक्के

अतिरिक्त वाढ केली जाईल. या संदर्भात गट सचिवांना सूचना दिल्याचे तालुका कर्ज वितरण अधिकारी ए. जी. उगले यांनी सांगितले.

तालुक्यात जवळपास २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे. पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या २० हजार ११६ सभासदांना खरिपासाठी १२ कोटी ७३ लाखांचे वाढीव कर्ज वितरण करण्यात येईल.

-डॉ.दिनेश परदेशी, जिल्हा बँकेचे संचालक

- मोबीन खान

Web Title: Aurangabad District Bank Loan Amount Benefit Vaijapur Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..