Aurangabad : जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदानासाठी झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

Aurangabad : जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदानासाठी झुंबड

औरंगाबाद : जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायतीपैकी १४ सरपंच, ३०८ सदस्य बिनविरोध झाले. उर्वरित २०२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता.१८) ७११ मतदान केंद्रांवर मतदान झाले. औरंगाबाद तालुक्यात १२९ तर कन्नड तालुक्यात १५३ असे सर्वाधिक मतदान केंद्रे होती. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ८६.५५ टक्के मतदान झाल्याचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.

औरंगाबाद तालुक्यात ३५ ग्रामपंचायतीपैकी ३३ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. तालुक्यात १२९ मतदान केंद्रांवर मतदान झाले. पैठण तालुक्यात २२, सिल्लोड तालुक्यात १८, खुलताबाद तालुक्यात १० ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले तर फुलंब्री तालुक्यात १८ ग्रामपंचायतींपैकी १७ ग्रामपंचायतींत मतदान झाले. सोयगावात ५ पैकी ४, कन्नड तालुक्यात ५१ पैकी ४९, वैजापूर तालुक्यात २५ पैकी २४ तर गंगापूर तालुक्यात ३२ पैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले.

२१६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य निवडीसाठी मतदान झाले. यापैकी २०८ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्षात मतदान झाले. औरंगाबाद तालुक्यात १२९, पैठण तालुक्यात ९४, फुलंब्री तालुक्यात ५९, सिल्लोड तालुक्यात ६५, सोयगाव तालुक्यात १२, कन्नड तालुक्यात १५३, खुलताबाद तालुक्यात ३१, वैजापूर तालुक्यात ७४ आणि गंगापूर तालुक्यातील ९४ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६१४ थेट सरपंचपदासाठी उमेदवार तर सदस्यपदासाठी ३ हजार ६९० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान सकाळपासून मतदान केद्रांवर नागरिकांची मतदानासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.

तालुका मतदान टक्केवारी

औरंगाबाद ८७.२२

पैठण ८६.६४

फुलंब्री ८७

सिल्लोड ८५.५७

सोयगाव ८६.११

कन्नड ८७.७०

खुलताबाद ८८.८२

वैजापूर ८५.५९

गंगापूर ८४.१२