औरंगाबाद : नशेखोरीचा विळखा होतोय घट्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

औरंगाबाद : नशेखोरीचा विळखा होतोय घट्ट

औरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणावर नशेच्या गोळ्यांचा वापर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएस सेलने धडक कारवाई करत नशेच्या गोळ्यांच्या मोठा साठा जप्त केला. या प्रकरणात मेडिकल चालकासह तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी लांजी रोडवर तारासिंग जगदीश सिंग टाक (वय २०, रा. आलाना कंपनी जवळ गेवराई तांडा) हा शिवम मेडिकल येथून नशेच्या गोळ्या घेऊन अवैध विक्रीसाठी गेला, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तारासिंगला ताब्यात घेतले, त्या वेळी त्याच्याकडे २४८ नशेच्या नशेच्या गोळ्या आढळून आल्या. त्याने या गोळ्या मेडिकल चालक शिवप्रसाद सुरेश चनघटे यांचेकडून घेतल्याचे सांगीतले. त्यानंतर चनघटे याच्याकडेही ७५ गोळ्या आढळून आल्या, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारणा केल्यावर त्याने या गोळ्या महेश उनवणे याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी महेश उनवणे याचा शोध घेत त्यालाही ताब्यात घेतले तर त्याच्या त्याब्यात पुन्हा तब्बल १,७२५ गोळ्या आढळून आल्या.

आरोपींनी यापूर्वी लांजी रोडवरील तनूजा मेडिकल, तसेच पंढरपूर येथील लाईफ लाईन मेडिकल यांचेकडूनही नशेच्या गोळ्या खरेदी केल्याचे सांगीतले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तारासिंग जगदीशसिंग टाक, शिवप्रसाद चनघटे, महेश उनवणे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल २०४८ अल्‍फ्राझोलम या नशेच्या गोळ्या तसेच ३७१२ सिल्डनाफिल गोळ्या व २२८ एमटीपी कीट तसेच रोख रक्कम दुचाकी असा एकूण ३ लाख ३७ हजार ६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न व औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांच्या समक्ष ही कारवाई करण्यात आली आहे. मिटकर यांच्याच फिर्यादीवरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहसीन सय्यद, नंदकुमार भंडारे, जमादार सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहुळ, प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुधाळकर तसेच अन्न निरिक्षक बळीराम मरेवाड आदींनी केली.

Web Title: Aurangabad Drugs Stock Seized Three Arrested Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top