Aurangabad: कोरोना लसीचा डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

फुलंब्री : कोरोना लसीचा डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : तालुक्यातील ज्या शासकीय कर्मचाऱ्याने कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा कर्मचाऱ्याचा नोव्हेंबर महिन्याचा पगार देऊ नका अशा प्रकरच्या सूचना जिल्हा परिषदकडून देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होताना दिसून येत आहे. कोरोना लस न घेणारे अधिकारी कर्मचारी आता लस घेऊन कार्यालयात लस घेतल्याचे प्रमाणपत्र जमा करू लागले आहेत.

जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यातील ज्या अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलेला नसेल तर त्याचे नोव्हेंबरचे वेतन दिले जाऊ नये अशा प्रकरच्या लेखी सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी दिलेल्या आहेत. यासंदर्भात पत्र फुलंब्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

या पत्राचा संदर्भ घेऊन गटविकास अधिकारी डॉ. विलास गंगावणे यांनी पंचायत समितीच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना लस घ्यावी अन्यथा वरिष्ठांच्या आदेशानुसार पगार थांबविण्यात येईल अशा सूचना दिल्या आहे. त्यामुळे ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी लस घेतली नाही असे अधिकारी व कर्मचारी लस घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येऊ लागले आहे. लस न घेणाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेश येताच लसीकरनाचा टक्काही दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

अनेक कर्मचारी लसविनाच!

कोरोनाच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवून संबंधित अधिकाऱ्यांनी असे आदेश काढलेले असल्याचे दिसून येते असे असले तरी तालुक्यात अजून अनेक शासकीय कर्मचारी यांनी लसीकरण केलेले नाही. यात जिल्हा परिषद वगळता इतर विभागाचे हि आहेत. त्यांना मात्र त्याच्या विभागा कडून अशा प्रकारचे पत्र आलेले नाही शिवाय सहकार क्षेत्रातील कार्यालयात हि अनेक कर्मचारी या लसीपासून दूर असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

loading image
go to top