

Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर: समर्थनगर परिसरात एका ऐतिहासिक बारवेलगत अतिक्रमण करण्याचा डाव महापालिकेने हाणून पाडला. सोमवारी (ता. १६) अतिक्रमण हटाव विभागाने या ठिकाणी उभारलेले पत्र्याचे शेड हटविले.
समर्थनगर भागात राजेश नावाच्या व्यक्तीसह इतरांनी ऐतिहासिक बारवेलगत ३० बाय ३० या आकाराच्या जागेत पत्र्याचे शेड मारून जागेवर कब्जा करण्याच्या प्रयत्न केला होता. अतिक्रमण निरीक्षक व सहायक आयुक्त गस्त घालत असताना हा प्रकार लक्षात आला.