Aurangabad : दोन महिन्यांपासून छापत होते बनावट नोटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime

Aurangabad : दोन महिन्यांपासून छापत होते बनावट नोटा!

औरंगाबाद : शहरालगतच चक्क पंक्चरच्या दुकानात बनावट नोटा छापखान्यावर छापा टाकत गुन्हे शाखेने तो उध्वस्त केला होता. एकाच दिवशी घारदोन येथील पंक्चरच्या दुकानात आणि वेदांतनगर भागात या कारवाया १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी केल्या होत्या. विशेष म्हणजे हा छापखाना मागील दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आला आले, शहर परिसरात विविध गुन्ह्यातील सराईतांच्या मदतीने नोटा छापणे सुरु होते, या टोळीने जवळपास ८० हजार रुपये चलनात आणल्याची कबुली पोलिसांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

गुन्हे शाखेने पोलिसांनी सहा जणांना अटक करुन पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केले होते. तर सातवा आरोपी फरार झाला होता. हनुमंत अर्जून नवपुते (२१, रा. घारदोन) किरण रमेश कोळगे (२३, रा. गाडीवाट) चरण गोकूळसिंग शिहरे (४०) प्रेम गोकूळ शिहरे (२६, रा. दोघेही घारदोन), संतोष विश्वनाथ शिरसाठ (४७, रा राजीवनगर, रेल्वे स्टेशन) आणि हारूनखान पठाण (रा. बायजीपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या टोळीच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप काळे यांनी दिली.

आरोपींनी १०० रुपयांच्या नोटांसोबतच दोनशे रुपयांच्याही नोटा छापल्याचे समोर आले. पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप काळेंनी आरोपीकडून शंभर रुपयांच्या नोटा छापले ३० तर दोनशे रुपयांच्या नोटा छापलेले १८ पेपर जप्त केले असून १०० च्या नोटांची एक बाजू छापलेल्या ४५ नोटा जप्त केल्याचेही उपनिरीक्षक काळे यांनी सांगितले.

शिवाजीनगर पाण्याच्या टाकीजवळ दोघेजण दुचाकीवर (एमएच २० एफवाय ९५७९) बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्यासाठी दुचाकीवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावून आरोपी हनुमंत नवपुते, आणि किरण कोळगे (२३, रा. गाडीवाट) या दोघांना पकडले. त्यानंतर सातजणांची टोळीच या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी चरण आणि प्रेम या दोघांना बेड्या ठोकत पंक्चर दुकानातील छापखाना उध्वस्त केला. संतोष सिरसाठ हा वेदांतनगरातील राजीवनगरात बनावट नोटा बनवत असल्याचे स्पष्ट होताच तोही छापखाना उध्वस्त केला.

Web Title: Aurangabad Fake Money Notes Printing Fraud Two Months

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..