Aurangabad : ऐन दिवाळीत सडलेल्या पिकांचा स्टॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : ऐन दिवाळीत सडलेल्या पिकांचा स्टॉल

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने खरीप पिकांसह फळ, भाजीपाला सडला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी पळशी शहर येथे दिवाळीच्या दिवशीच सडलेल्या पिकांचा स्टॉल लावला. कोंब आलेला मका, बाजरी, सडलेले कांदे, टोमॅटो, सोयाबीन, कापूस याला कुणी खरेदीदार मिळणार आहे का ? असा सवाल करत पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे हाताशी आलेला मका, बाजरीला कोंब फुटले आहेत. सोयबीनसह टोमॅटोची नासाडी झाली. वेचणीला आलेला कापूस भिजला. आता शेतात पंचनामे करण्यासाठी पिकेसुद्धा शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शंकरराव ठोंबरे, नानासाहेब पळसकर, दत्तु पळकर, सुभाष लहाने आदी शेतकऱ्यांनी केली.