
smart city
sakal
छत्रपती संभाजीनगर, ता. १६: महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण केल्यानंतर आता हे रस्ते आदर्श रस्ते म्हणून विकसित केले जाणार आहेत. शासनानेही रस्ते कामासाठी निधी देण्याची तयारी दर्शविल्याने महापालिकेने ‘पेडेको’ संस्थेमार्फत डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील रस्त्यांचा अभ्यास संस्थेमार्फत सुरू आहे. त्यानुसार गुरुवारी ‘स्मार्ट सिटी’ कार्यालयात सादरीकरण करण्यात आले.