औरंगाबाद : धान्याचे भावफलक लावणे बंधनकारक; शीतल राजपूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad food price boards mandatory

औरंगाबाद : धान्याचे भावफलक लावणे बंधनकारक; शीतल राजपूत

फुलंब्री : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी द्वारपोच झालेले धान्य ठरलेल्या मुदतीतच वाटप करावे तसेच त्याचबरोबर दुकानांवर भाव फलक लावावा. त्याचबरोबर शंभर टक्के आधार शेडिंग करण्यासाठी केवायसीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या सूचना तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहे.

फुलंब्री येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय फुलंब्री येथे तहसीलदार राजपूत यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक घेण्यात आली. पुढे बोलताना तहसीलदार डॉ.राजपूत म्हणाल्या की, तालुक्‍याचे शंभर टक्के आधार सीडिंग करण्यासाठी केवायसीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. ज्या लाभार्थ्यांची केवायसी होत नाही त्यांचे आधार कार्डच्या झेरॉक्स प्रति कार्यालयात जमा कराव्यात.

गावातील मयत लाभार्थी/ विवाहित महिला/अनाथ/दुर्बल घटक असल्‍यास या सर्वांची वर्गवारी पद्धतीने यादी करून सदर यादी या कार्यालयास सादर कराव्यात. तसेच द्वारपोच झालेले धान्‍य मुदतीत वाटप करण्‍याचे निर्देश यावेळी देण्यात आले. सर्व दुकानांवर बोर्ड व भावफलक लावण्याविषयी तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांनी सूचना दिल्या. यावेळी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ध्वजाचा सन्मान राखा

-जिल्हाधिकारी डॉ.सुनील चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे स्वातंत्र्यच अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे- हर - घर तिरंगा बाबत गावामध्ये जनजागृती स्वस्त धान्य दुकानदारांनी करावी. त्याचबरोबर हा अमृत महोत्सव साजरा करताना झेंड्याचा सन्मान राखण्यासंदर्भात सर्व गावकऱ्यांना जागृत करावे अशा सूचना यावेळी तहसीलदार डॉ.राजपूत यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या आहे.

Web Title: Aurangabad Food Price Boards Mandatory Shop Phulambri Tehsildar Appeal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..