औरंगाबाद : आता पेट्रोल पंपचालकांचा कोटा ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

petrol

औरंगाबाद : आता पेट्रोल पंपचालकांचा कोटा ठरणार

औरंगाबाद : सातत्याने होणारी पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंप ड्राय होत आहेत. असे असताना यावर तोडगा काढण्याऐवजी इंधन (ऑइल) कंपन्यांतर्फे आता पंपचालकांना कोटा निश्‍चित करण्याचा नियम आणला आहे. रोज पंपचालकांकडे किती स्टॉक आहे. त्यावरून इंधन द्यायचे की नाही हा निर्णय आता कंपनी घेणार आहे. यामुळे निर्णयामुळे आगामी काळात जिल्ह्यात कृत्रिम इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पेट्रोलियम डीलर असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात तसेच राज्यातील विविध भागांतील पंपचालकांना पेट्रोल आणि डिझेलचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. सध्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठा कमी करण्यात येत आहे. यामुळे अनेक पंपचालकांना नो स्टॉकचा बोर्ड लावावा लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबारसह अन्य भागात पन्नास रुपयांपेक्षा कमी पेट्रोल विक्रीवर बंधने टाकण्यात आली होती. याशिवाय पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्यांना पेट्रोल खरेदीची प्रिंट देणे पंपचालकांना बंधनकारक करण्यात आली होती. या निर्णयामुळे पंपचालक अडचणीत आले होते. औरंगाबादेत हा नियम लागू करण्यात आलेला नाही. मात्र, आता ऑइल कंपनीकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्याबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामध्ये एका पंपावर सामान्य दिवसात किती लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. याची माहिती ऑइल कंपन्यांकडे ऑनलाइन आहे. या माहितीचा वापर करून संबंधित पेट्रोल पंपावर किती पेट्रोल लागत आहे. याचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा एखाद्या पंपचालकाने पार केल्यानंतर त्याला पुढील पेट्रोल दिले जात नाही. ऑइल कंपन्यांचा हा निर्णयही पंपचालकांसाठी अडचणीचा ठरत आहे. हा नियम सध्या उत्तर महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. यानंतर लवकरच हा निर्णय औरंगाबाद व मराठवाड्यातील पंपचालकांना लागू केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पेट्रोल रेशनिंगचा मुद्दा आम्ही पहिल्यापासून मांडत आहोत. पूर्वी विक्री वाढवा असे कंपनीकडून सांगितले जात आहे. आता विक्री कमी करा असा संदेश ऑइल कंपनीच्या निर्णयामुळे समोर येत आहे. औरंगाबादेत हा निर्णय लागू झालेला नाही. मात्र कोटा सिस्टम औरंगाबादसह जिल्ह्यातील पंपचालकांना ठरविला गेल्यास, पंपचालकांना सामान्य नागरिकांचा रोष पत्करावा लागेल.

-अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन

Web Title: Aurangabad Fuel Shortages Petrol Pump Operators Limited Stock Fuel Companies New Rule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top