Aurangabad औरंगाबाद : गंगापुरात बारा दिवसांपासून पाणीबाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply problem

औरंगाबाद : गंगापुरात बारा दिवसांपासून पाणीबाणी

गंगापूर : शहराचा पाणीपुरवठा बारा दिवसापासून बंद असल्याने गंगापूर नगरपालिकेचा निषेध करीत एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोदावरी अंघोळ करून बुधवारी आंदोलन केले.गेल्या अनेक दिवसापासून गंगापूर शहरात विविध भागात पाणीपुरवठा बंद असून, जवळपास शहरात दहा ते बारा दिवस पाणी नाही.

हा प्रकार नेहमीच घडत असल्याने शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराच्या विरोधात एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गोदावरी नदीत अंघोळ करून आंदोलन केले.

यावेळी तहसीलदार सतीश सोनी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील सहा महिन्यापासून गंगापूर शहरात पाणीपुरवठा अभियंता गैरहजर असल्याने व शहरातील पाणीपुरवठा नियोजन ढिसाळ असल्याने शहरात तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत नगरपालिकेला २५ ऑगस्ट व २२ नोव्हेंबर २०२१ तसेच २७ डिसेंबर २०२१ रोजी पाण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांना देखील निवेदन देऊन पाणी टंचाई सुरळीत करून पाणीपुरवठा अभियंता श्री. व्यवहारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र,कुणीही दखल घेतली नाही. या आंदोलनात तालुकाध्यक्ष राहुल वानखेडे, शहराध्यक्ष फैसल बासोलान, तालुका संघटक वैभव खाजेकर, युवा शहराध्यक्ष नदीम खान, शहर सचिव इम्रान खान, सरवर जहुरी, मुबिन शेख, मोहसीन शेख आदींनी सहभाग घेतला.

नागरिकांना भटकावे लागते वणवण

सध्या रमजानचा महिना सुरु असूनही पाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील विविध वार्डातील नागरिक हे पाण्यासाठी गंगापूर नगरपालिकेत चकरा मारत असून याबाबत गंगापूर नगरपालिकेकडून पाण्याबाबत कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात गंगापूर शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय हाल-अपेष्टा सोसाव्या लागत आहे.

Web Title: Aurangabad Gangapur Twelve Days Water Problem Mim Prohibition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top