
औरंगाबाद : घाटीत महत्त्वाच्या शस्त्रक्रिया रद्द
औरंगाबाद : अस्थायी सहायक प्राध्यापकांना वैद्यकीय शिक्षण सचिवांकडून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी घाटीतील डॉक्टर्स व अस्थायी सहायक प्राध्यापकांनी शनिवारी (ता. पाच) निषेध व्यक्त करीत काम बंद आंदोलन केले. यामुळे घाटीच्या ‘ओपीडी’ व ‘आयपीडी’सह शस्त्रक्रिया तसेच एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला. शुक्रवारी (ता. चार) अधिष्ठातांना याबाबत अस्थायी सहायक प्राध्यापकांनी निवेदन दिले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी अकरानंतर सुमारे दीडशे डॉक्टर्स, सहायक प्राध्यापक घाटीत एकत्र जमले. त्यांनी सामुहिक कामबंद आंदोलन सुरु केले. घोषणाबाजी करून अधिष्ठातांना मागण्यांबाबत निवेदन दिले. दुपारपर्यंत आंदोलन सुरूच होते.
हेही वाचा: आठवणीतील लतादीदी! गायनाची सुरवात सोलापुरातून
प्रवेश प्रक्रियेवर परिणाम
एमबीबीएसच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. पण घाटीतील अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या आंदोलनाचा परिणाम या प्रवेश प्रक्रियेवर झाला. पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रीया आज झाली नाही. त्यामुळे प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला व त्यांनाही त्रास सहन करावा लागला.
''घाटीत आज होणाऱ्या महत्वाच्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. रूग्णसेवेवरही मोठा परिणाम जाणवला. ओपीडीची रोजचा नियमीत अकडा दोन हजारांवर असतो पण आज बाह्यरूग्ण विभागात एक हजार एक रूग्णांचीच तपासणी झाली. रोज दोनशे रुग्ण भरती होतात, आजच्या आंदोलनामुळे एकशे एक रूग्णच भरती झाले. आज घाटीची कमान वैद्यकीय अधिकारी व निवासी डॉक्टरांनी सांभाळली.''
-डॉ. काशीनाथ चौधरी, अधीक्षक, घाटी रूग्णालय.
Web Title: Aurangabad Ghati Hospital Canceling Important Surgeries
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..