औरंगाबाद : घाटीत रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवेशासाठी पास बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Ghati Hospital Doctor Beating Case

औरंगाबाद : घाटीत रुग्णांच्या नातेवाइकांना प्रवेशासाठी पास बंधनकारक

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णावर उपचार करीत असताना मध्यरात्री निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. यात निवासी डॉक्टरांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. घटनेनंतर मार्डतर्फे आंदोलन करण्यात आले. याची तत्काळ दखल घाटी प्रशासनाने घेतली. घाटीत प्रवेशासाठी पास पद्धत सुरू करण्यात येणार आहे. एका रुग्णसोबत केवळ दोनच नातेवाइकांना राहता येणार आहे.

सघाटीच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे-कागिनाळकर म्हणाल्या, की निवासी डॉ. उदय चेंदूर यांना मारहाण झाली होती. या घटनेनंतर बैठक घेतली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आमचे डॉक्टर प्रामाणिकपणे काम करतात. अनोळखी दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या निवासी डॉक्टरवर एका समूहाने हल्ला केला आहे. ही गंभीर घटना आहे. व्हिजिटिंग अवर्समध्ये रुग्णांचे शेकडो नातेवाईक आत जातात. आता हे बंद होणार आहे. रुग्णाला भेट देण्यासाठी व्हिजिटिंग अवर्स पास पद्धत सुरू करणार आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो सर्वांनी शिस्त पाळा, सुरक्षारक्षक, डॉक्टर यांच्याशी हुज्जत घालू नका. डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी केले.

६ ते ७ सुरक्षारक्षकांना टर्निमेट करा

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. असे असतानाही डॉक्टरांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आम्ही मास्को आणि एम.एस.एफ.च्या ६ ते ७ सुरक्षारक्षकांना टर्मिनेट करण्याची मागणी केली आहे. त्यांना कामावरून काढून टाकण्याची विनंती केली असल्याचीही माहिती अधिष्ठाता रोटे-कागिनाळकर यांनी दिली.

हे घेतले निर्णय

  • घाटीत रुग्णासोबत असलेल्यांना पास बंधनकारक

  • केवळ दोनच व्यक्तींना प्रवेश

  • शस्त्रक्रिया विभागाचे दोन गेटपैकी एक गेट बंद करणार

  • घाटी परिसरात प्रशासनाने लावलेल्या स्टिकर्स असलेल्या वाहनालाच प्रवेश

  • इतरांनी नातेवाइकांसाठी असलेल्या पार्किंगमध्येच वाहने उभी करावी

  • सामाजिक संस्थांनी गर्दी करून नयेत, नियमांचे पालन करावे

  • जे लोक शिजवलेले अन्न वाटप करतात, त्यांनी ते घाटी कॅन्टींगकडे द्यावेत ते आम्ही वाटप करू

  • दोन ते तीन ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू

Web Title: Aurangabad Ghati Hospital Doctor Beating Case Pass Mandatory For Patients Relatives Entry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..