Aurangabad : औरंगाबाद मध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

Aurangabad : औरंगाबाद मध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार

वाळूजमहानगर : विद्यार्थिनीवर मैत्रीचा बहाणा करून आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी कार्तिक उल्हास राठोड (रा. वडगाव कोल्हाटी, बजाजनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

सदर वडगाव (कोल्हाटी) येथील पीडित विद्यार्थिनी बजाजनगर येथे सायन्स ११ वीच्या वर्गात शिकते. ३० डिसेंबर २०२२ ती बजाजनगर येथे क्लासेसला गेली होती. दुपारी घराकडे जात असताना सिडको गार्डनजवळ परिचयाचा मित्र कार्तिक राठोड याने आपण कॅफे किस्टल येथे जाऊ, असे सांगितले. नकार दिल्यानंतर त्याने न ऐकता दुचाकी तिथे उभी करून तिच्याच स्कुटीवर बसला व साजापूर येथील हॉटेलवर इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

यानंतर आरोपीने तिला सिडको गार्डन बजाजनगर येथे सोडले. ती घरी गेली तेव्हा आई- वडील गावाकडे होते. त्यामुळे तिने काहीही सांगितले नाही. मात्र, घटनेची वाच्यता न झाल्याने आरोपीची हिंमत बळावली. तो तिला मेसेज करून त्रास देत होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून रडत बसत होती. भावाने आई-वडिलांना घरी बोलावून घेतले.

तेव्हा तिने घडलेली हकीकत सांगितली. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तिक उल्हास राठोड विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे, यशवंत गोबाडे सूरज, अग्रवाल संदीप घाडगे आदींनी आरोपीस पंढरपूर येथून अटक केली.