औरंगाबाद : आता तरी जिल्ह्याला अच्छे दिन येणार का ;इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील यांचा टोला
इम्तियाज जलील
इम्तियाज जलील sakal

औरंगाबाद राज्याच्या मंत्रीमंडळात औरंगाबादेतील अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अतुल सावे यांचा समावेश झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन करतांनाच आता तरी जिल्ह्याला अच्छे दिन येणार का? असा टोला देखील लगावला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, की आता औरंगाबादला पाच मंत्री आहेत. मराठवाडा आणि जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष दूर करण्याचा औरंगाबादचा हा सुवर्णकाळ आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया. सर्व नवीन मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा. इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी पक्षावर नेहमीच शहरातील पाणी, रस्ता, वीज, कचरा या मुलभूत प्रश्नांवरून टीकेची झोड उठवलेली आहे. पंतप्रधान आवास योजना आणि शहराच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी वेळोवेळी लोकसभेत देखील मांडला आहे. आता केंद्रात आणि राज्यात जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे किमान हे प्रश्न तरी सुटतील, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com