Aurangabad : भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Gopinath Munde

Aurangabad : भाजपतर्फे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

औरंगाबाद : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता.१२) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गोपीनाथ गडावरून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ६०० हून अधिक ठिकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्वाईन झाले होते. यात उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयात शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम घेत या उपक्रमात पदाधिकारी सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले, सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सर्वोच्च पदावर बसवणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता ,वंचित उपेक्षित घटकाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे मार्गदर्शन केले. भाजपा वैद्यकीय आघाडीच्या प्रमुख डॉ. उज्वला दहिफळे यांच्यावतीने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अनाथाश्रमात फळ वाटप करून, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रदेश सचिव प्रवीण घुगे, अल्पसंख्याक मोर्च प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख ,सरचिटणीस राजेश मेहता, कचरू घोडके, माधुरी आदवंत, किरण पाटील, जालिंदर शेंडगे, दिलीप थोरात, दयाराम बसय्ये, प्रदिप पाटील, सतीश नागरे, दीपक ढाकणे, व्यंकटेश कमळू, डॉ.राम बुधवंत, बबन नरवडे,धनंजय कुलकर्णी, विकास कुलकर्णी, हेमंत खेडकर, मनीषा मुंडे , दौलत खान पठाण, कुणाल मराठे, गोपीनाथ वाघ, मंगलमूर्ती शास्त्री, लता दलाल,अमृता पालोदकर, अरविंद डोणगावकर, बालाजी मुंडे,संग्राम पवार उपस्थित होते.

दरम्यान, उस्मानपुरा कार्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी प्रत्येक पदाधिकाऱ्याने मनोगत व्यक्त केले. यात एका पदाधिकाऱ्याने गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीऐवजी वाढदिवसाचा उल्लेख केल्यामुळे सर्वच आश्‍चर्यचकित झाले. हे लक्षात आल्यानंतर तात्काळ सारवा-सारव करण्यात आली.