Aurangabad : गुंठेवारीसाठी सप्टेंबरपासून शंभर टक्के शुल्क

रेडीरेकनरच्या पन्नास टक्के सवलत देऊनही अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद
Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal Corporation

औरंगाबाद : गुंठेवारी नियमितीकरणासाठी रेडीरेकनरच्या पन्नास टक्के सवलत देऊनही अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला होता. गुंठेवारीधारकांचे सवलत मिळवण्यासाठी संचिका दाखल करण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी पाच महिन्यांपूर्वी तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दरमहा १० टक्के सवलत कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चालू ऑगस्टपर्यंत ही सवलत कमी कमी होत ९० टक्क्यापर्यंत घटली आहे. आता १ सप्टेंबरपासून शंभर टक्के शुल्क भरूनच नागरिकांना गुंठेवारी नियमितीकरणाचा लाभ घेता येणार आहे.

१५०० चौरस फुटापर्यंतची निवासी बांधकामे नियमित करण्यासाठी रेडीरेकनरच्या ५० टक्के शुल्क सुरवातीच्या काळात आकारले गेले. सप्टेंबर २०२१ पासून सुरू केलेल्या या मोहिमेत सुरवातीच्या काळात अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अधिकच्या संचिका दाखल झाल्या. मात्र त्यानंतर प्रमाण घटतच गेले.

दरम्यान, ९ जुलै २०२१ पासून पालिकेने गुंठेवारी नियमितीकरणाची मोहीम हाती घेतली. तेव्हापासून मंगळवार दि.२३ ऑगस्ट २०२२ पर्यंत पालिकेच्या गुंठेवारी कक्षाकडे ९,६८१ संचिका दाखल झाल्या. त्यापैकी ८,५५६ संचिका मंजूर करण्यात आल्या. तर विविध त्रुटींमुळे ५६३ संचिका या नामंजूर केल्या आहेत.

सातारा-देवळाईतून सर्वाधिक प्रतिसाद

प्रभाग-८ मधील सातारा-देवळाई भागातून गुंठेवारी नियमितीकरणाला आतापर्यंत सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला आहे. आजपर्यंत या प्रभागातून ४ हजार २२९ संचिका दाखल झाल्या. त्यापैकी ३,६२७ मंजूर करण्यात आल्या. तर २२८ संचिका नाकारण्यात आल्या. यापाठोपाठ प्रभाग-१, ८ आणि ७ मधून चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रभागांतून अनुक्रमे ११३४, ११५२, १३०५ संचिका मंजूर झाल्या आहेत. सर्वाधिक कमी प्रतिसाद प्रभाग-२ मधून मिळाला आहे. या प्रभागातून केवळ ५७ संचिका दाखल असून त्यापैकी ३९ जणांच्याच मालमत्ता नियमित झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com