

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: एका हॉटेलमध्ये दारू रिचवत पार्टी केली, नंतर नशेत तर्र चौघांनी व्यवस्थापकालाच तलवारीचा धाक दाखवला. मारहाण करून पाच हजार रुपये लुटले. यानंतर अमराठी स्टाफ चालणार नाही, असे धमकावत १४ हजार ३३३ रुपयांचे पार्टीचे बिल न भरता तेथून धूम ठोकल्याची घटना शनिवारी (ता. २१) रात्री लिंक रोडवरील हॉटेलमध्ये घडली.