
औरंगाबाद : कत्तलीसाठी जनावरे नेणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
औरंगाबाद - कत्तलीसाठी आणलेले बैल, गाय, कालवड, हेले अशी २ लाख ३० हजार रुपये किमतीची १९ जनावरे उस्मानपूरा पोलिसांनी शुक्रवारी पकडल्याची माहिती निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
प्रतापनगर स्मशानभूमीच्या रोडजवळील मोकळ्या मैदानात गोवंशासह इतर जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी आणली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, उपनिरीक्षक विनोद आबुज यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारे शहाबाज मुख्तार कुरेशी, रफिक नबाब कुरेशी (दोघे रा. बडा अशुरखाना, उस्मानपुरा) यांची चौकशी केली असता त्यांना उत्तरे देता आली नाहीत. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून २ लाख ३० हजार रूपये किंमतीची १९ जनावरे ताब्यात घेतले आहेत.
उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार अरूण हातागळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कत्तलीसाठी जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या शहाबाज मुख्तार कुरैशी, रफिक नवाब कुरैशी यांच्याविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद आबूज करीत आहेत.
Web Title: Aurangabad Illegal Smuggler Two Animals Killer Caught By Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..