रक्तगट न जुळणाऱ्या सासूचे जावयाला किडनी दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad mother in law kidney Donate

रक्तगट न जुळणाऱ्या सासूचे जावयाला किडनी दान

औरंगाबाद : येथील कमलनयन बजाज रुग्णालयात रुग्णांच्या सासूचे रक्तगट मिळत नसतानाही डॉक्टरांनी अंत्यंत गुंतागुंतीची अशी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. यामुळे रुग्णाला जीवदान मिळाले असून रक्तगट जुळत नसतानाही शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हान होते, असे मत डॉ. समीर महाजन यांनी व्यक्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव येथील ४६ वर्षीय रुग्ण किडनी आजाराने ग्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. यामुळे हा रुग्ण डायलिसीसवर होता. किडनीच्या रोगावर उपचार घेण्यासाठी अनेक ठिकाणी या रुग्णाला नेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी योग्य उपचार झाला नाही. यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. एक संदर्भ घेऊन हा रुग्ण बजाज रुग्णालयात आल्यानंतर डॉ. समीर महाजन यांना भेटला. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास योग्य मार्गदर्शन केले. किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी हा रुग्ण प्रयत्न करीत असताना कुटुंबातील योग्य किडनी दाता नसल्याने त्यांच्या समोर मोठी पेच निर्माण झाला होता. अशा कठीण परिस्थितीत रुग्णाच्या सासूने किडनी दानासाठी तयार झाल्या. मात्र, तपासणी अंती त्यांच्या सासू योग्य ठरल्या. परंतु त्यांचा रक्तगट जुळला नसल्यामुळे प्रत्यारोपण कठीण होते.

मात्र, कमलनयन बजाज हॉस्पिटल येथे किडनी विकार तज्ज्ञ डॉ. समीर महाजन यांनी वेगवेगळ्या रक्तगटाच्या किडनी प्रत्यारोपण करण्याचे आवाहन स्वीकारले. रुग्ण व मूत्रपिंड दाता या दोघांचे रक्तगट वेगळे असतानाही ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया होऊन पाच आठवडे झाले असून रुग्ण ठणठणीत आहे. शस्त्रक्रिया यशस्वितेसाठी डॉ. समीर महाजन, मूत्रपिंड शल्यचिकित्सक डॉ. अजय ओसवाल, डॉ. राजेश सावजी, भुलतज्ज्ञ सचिन नाचने व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नताशा वर्मा म्हणाल्या की, कमलनयन बजाज रुग्णालय हे मराठवाड्यातील सर्वात जुने किडनी प्रत्यारोपण करणारे सेंटर आहे. येथे अनुभवी स्टाफ व तज्ञ डॉक्टर कार्यरत आहे. मेडिकल डायरेक्टर डॉ. मिलिंद वैष्णव म्हणाले की, बजाज रुग्णालयात स्वॅप किडनी प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपी, रोबोटिकव्दारे किडनी प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यावेळी रुग्णालयाचे विश्‍वस्त सी. पी. त्रिपाठी यांनीही रुग्णालयाच्या कार्याविषयी माहिती दिली.

Web Title: Aurangabad Kamalnayan Bajaj Hospital Mother In Law Kidney Donate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top