
औरंगाबाद : पावसाला सुरूवात होऊन महिना झाला असला तरी अद्याप मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये फक्त ४१ टक्के पाणीसाठा आहे. सध्या या धरणांमध्ये २ हजार ११९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. तर या धरणक्षेत्रांमध्ये जूनपासून आतापर्यंत १,७३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जूनपासून चार जुलैपर्यंत २,१४२ मिलीमीटर पाऊस झाला होता.
मराठवाड्यात ११ मोठी धरणे आहेत. या ११ धरणांची ५,१५६ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता आहे. यामध्ये सर्वात मोठे जायकवाडी धरण असून यामध्ये सध्या ७३३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ३३ टक्के इतके आहे. निम्न दुधना धरणात सध्या १४० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५७ टक्के इतके आहे. येलदरीमध्ये सध्या ४३७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५४ टक्के इतके आहे.
माजलगावमध्ये सध्या ९७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ३१ टक्के इतके आहे. मांजरा मध्ये सध्या ४९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण २७ टक्के इतके आहे. उर्ध्व पेनगंगामध्ये सध्या ४९९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५१ टक्के इतके आहे. निम्न मनारमध्ये सध्या ४५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ३२ टक्के इतके आहे.
निम्न तेरणा मध्ये सध्या ४५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ४९ टक्के इतके आहे. विष्णुपुरी मध्ये सध्या ५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ७० टक्के इतके आहे. सीना कोळेगावमध्ये सध्या १४ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण १६ टक्के इतके असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
प्रमाण कमीच
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे आतापर्यंत प्रमाण कमीच आहे. गेल्यावर्षी जूनपासून चार जुलैपर्यंत या ११ धरणांच्या क्षेत्रात २,१४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यंदा या तारखेपर्यंत १७३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.