Aurangabad : औरंगाबाद, पैठण तालुक्यांच्या २४ गावांत भूसंपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Development

Aurangabad : औरंगाबाद, पैठण तालुक्यांच्या २४ गावांत भूसंपादन

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे- नगर- औरंगाबाद या राष्ट्रीय राजमार्ग (एक्सप्रेस - वे ) साठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या एक्सप्रेस-वेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद व पैठण तालुक्यातील २४ गावांतील भूसंपादन केले जाणार असल्याचे गेल्या १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या भारत सरकारच्या राजपत्रात म्हटले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

उत्तम दर्जाचे महामार्गाचे जाळे तयार करणारा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असा भारतमाला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे-नगर-औरंगाबाद असा राष्ट्रीय राजमार्ग तयार होणार आहे. भारतमाला प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे-नगर-औरंगाबाद एक्सप्रेस वे ( ग्रीनफिल्ड संरेखण ) साठी भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी कोणत्या गावात भूसंपादन केले जाणार आहे त्या गावांची यादी भारत सरकारच्या गेल्या १७ नोव्हेंबरच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापुर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव (बुद्रूक), चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी (खुर्द), पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, ववा, वरूडी(बुद्रूक), पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, अखतवाडा, वाघाडी, दादेगाव जहांगीर, पाटेगाव, साईगाव, पैठण ( एमसी-१) या गावांचा समावेश असल्याचे राजपत्रात म्हटले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.