esakal | जम्बो कोविड केअरसाठी ३५ लाखांचा प्रस्ताव, हवेशीर वातावरण करणार 

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

कोविड केअर सेंटरचे काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने इमारतीची दुरुस्ती करण्याची विनंती एमआयडीसीला केली आहे.

जम्बो कोविड केअरसाठी ३५ लाखांचा प्रस्ताव, हवेशीर वातावरण करणार 
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयडिया कॉल सेंटरमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. पण त्यापूर्वी इमारतीची दुरुस्ती करावी लागणार असून, त्यासाठी एमआयडीसीने ३५ लाख ३६ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

Corona Updates: चिंताजनक! औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पार


कोरोना काळात एमआयडीसी भागातील कंपन्यांच्या जागेचा महापालिकेला फायदा झाला आहे. मेल्ट्रॉन कंपनीच्या परिसरात एमआयडीसमार्फत ३०० खाटांचे कोविक केअर सेंटर उभारण्यात आले होते. नंतर ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. आता आयडीया कंपनीच्या इमारतीत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यानंतर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आयडीया कॉल सेंटरच्‍या इमारतीसह मराठवाडा रिअलेटर्स कंपनीच्या जागेची पाहणी केली होती.

औरंगाबादेत कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक, तब्बल १४ हजार २५७ जण कोरोनामुक्त

त्यातील आयडिया कॉल सेंटरमध्ये एक हजार रुग्णांची व्यवस्था होईल, असे कोविड केअर सेंटरचे काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने इमारतीची दुरुस्ती करण्याची विनंती एमआयडीसीला केली आहे. याविषयी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले की, एमआयडीसीने आयडिया कॉल सेंटरच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची तयारी दाखवली आहे. या कामासाठी त्यांनी ३५ लाख ३६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक देखील तयार केले आहे. वरिष्ठांकडून मंजुरी मिळाल्यावर दुरुस्तीचे काम लगेचच सुरु केले जाईल. ही इमारत पूर्णपणे वाहातुकूलीत होती, त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा काढून व्हेंटिलशनची व्यवस्था करावी लागणार आहे. खिडक्या वाढवाव्या लागणार आहेत. स्वच्छतागृहासह इतर व्यवस्था करावी लागणार आहे. 

Edited - Ganesh Pitekar