esakal | मराठवाड्याला वाढीव निधी किती मिळणार? औरंगाबादमध्ये अजित पवारांसह तेरा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

बोलून बातमी शोधा

marathwada meeting

पुढील वर्षासाठी आपल्याला वाढीव निधी मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून जोर लावला जाणार आहे

मराठवाड्याला वाढीव निधी किती मिळणार? औरंगाबादमध्ये अजित पवारांसह तेरा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
sakal_logo
By
सुनील इंगळे

औरंगाबाद: औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांच्या २०२१-२२ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियोजन प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१५) बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे डीपीडीसीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. तर कोरोना काळात जिल्ह्यातील आर्थिक गाडा कोडमडलेला असल्याने पुढील वर्षासाठी आपल्याला वाढीव निधी मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडून जोर लावला जाणार आहे.

भाजपा शिवसेना एकत्र! वर्षाअखेर पालिकेच्या निवडणुका

सोमवारी होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना बैठकीत सर्वप्रथम नांदेड जिल्हा त्यानंतर उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, बीड, जालना तर शेवटी औरंगाबाद जिल्ह्याची बैठक उपमुख्यमंत्री पवार घेणार आहेत.

बैठकीला उद्योग खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, अल्पसंख्याक विकासमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, जलसंधारणमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, फलोत्पादन व रोहयोमंत्री संदीपान भुमरे, महसूल व ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत.

Corona Updates : औरंगाबादेत ५८ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४६ हजार ८९ कोरोनामुक्त

दरम्यान औरंगाबाद विभागासाठी वर्ष २०२०-२१ साठी २०११.३० कोटी इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे, तर शासनाने आर्थिक वर्षात १५५७.५२ कोटींची मर्यादा घालून दिली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत वाढीव नियतव्यय मंजूर करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा मंजूर नियतव्यय (कोटींत) आर्थिक मर्यादा

औरंगाबाद - ३२५.५० २६५.६८

जालना - २३५ १८१.१३

बीड - ३०० २४२.८३

परभणी - २०० १५६.८२

उस्मानाबाद -२६०.८० १६०.८०

लातूर - २४० १९३.२६

हिंगोली - १३५ १०१.६८

नांदेड -३१५ २५५.३२

एकूण -२०११.३० १५५७.५२

(edited by- pramod sarawale)