esakal | भिकार व्यवस्थेने कोरोनाबाधिताचा घेतला जीव, ऑक्सिजन अन् रुग्णवाहिका मिळेना

बोलून बातमी शोधा

भिकार व्यवस्थेने कोरोनाबाधिताचा घेतला जीव, ऑक्सिजन अन् रुग्णवाहिका मिळेना
भिकार व्यवस्थेने कोरोनाबाधिताचा घेतला जीव, ऑक्सिजन अन् रुग्णवाहिका मिळेना
sakal_logo
By
दीपक देशमुख

चिंचोली लिंबाजी (जि.औरंगाबाद) : घाटशेंद्रा (ता.कन्नड) येथील एका पन्नास वर्षीय पुरुषांचा शनिवारी (ता.एक) चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, घाटशेंद्रा येथील एका पन्नास वर्षीय पुरुषांनी शुक्रवारी (ता.३०) चिंचोली लिंबाजी येथील आरोग्य केंद्रात कोरोना अॅन्टिजेन चाचणी केली होती. यात रिपोर्ट निगेटिव्ह दिसून आले. मात्र संबंधित रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून येत असल्याने त्यास येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी दाखल होण्याच्या सूचना केल्या. मात्र संबंधित रुग्णांला औरंगाबाद येथे जाण्यास आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका मिळाली नसल्याने तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वासनास त्रास होत असल्याने परत सकाळी दहा वाजता स्वतःच्या दुचाकीवरून आरोग्य केंद्रात हजर झाला व येथे यास असह्य वेदना सुरु झाल्या.

हेही वाचा: औरंगाबादेत १ हजारांवर कोरोनाबाधित, १ लाख ११ हजार १४५ कोरोनामुक्त

मात्र अपुरी आरोग्य व्यवस्था व ऑक्सिजनची कमतरता यामुळे या रुग्णांचा येथे तडफडून मृत्यू झाला. यावेळी रुग्णास ऑक्सिजन किंवा रुग्णवाहिका मिळाली असती तर रुग्णांचा जीव वाचला असता. त्यानंतर अशा भयावय परिस्थितीत यापुढे या आरोग्य केंद्रात कर्मचारी संख्या वाढवा. नादुरुस्त रुग्णवाहिका लवकर दुरुस्त करा, असे लेखी आश्वासन द्या. तेव्हा आम्ही मृतदेह येथून हलवू असा कडक पावित्रा ग्रामस्थांनी घेतल्यानंतर दुपारी तिन वाजता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गव्हांडे यांनी रुग्णालयास भेट देऊन आश्वासन दिले. तेव्हा मृतदेह हलवून सायंकाळी पीपीई किट परिधान करुन व योग्य काळजी घेत घाटशेंद्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.