esakal | पैठणच्या आडूळ परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, २७ जण पाॅझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

पैठणच्या आडूळ परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, २७ जण पाॅझिटिव्ह
पैठणच्या आडूळ परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, २७ जण पाॅझिटिव्ह
sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : आडुळसह (ता.पैठण) परिसरात दोन दिवसांत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. रविवारी (ता.१८) व सोमवारी (ता.१९) परिसरात तब्बल २७ रुग्ण आढळून आले आहे. यात देवगाव येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला असून सोमवारी व रविवारी देवगाव येथे १४, आडुळमध्ये ४, अंतरवाली खांडीत ३, दाभरुळ २, कडेठाण ३ तर आडगाव ठोंबरे १ असे एकुण २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

रुग्ण आढळून जरी येत असले तरी येथील दुकानदारांकडुन कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन केले जात नसुन बंद असलेल्या आस्थापना ही येथे बिनधास्तपणे सुरु असल्याचे दिसून येते. शिवाय अत्यावश्यक सेवेच्या नावावर किराणा दुकानदार दुकाने तर चालु ठेवत आहेत. मात्र या दुकानावर ना सॅनिटाइजर, ना मास्क, ना शारीरिक अंतर पाळले जात आहे. शिवाय हे किराना दुकानदार त्यांना दिलेल्या १ वाजेच्या वेळेनंतर ही म्हणजेच दिवसभर दुकाना चालु ठेवत आहेत. ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी नागरिक करित आहेत.