esakal | Coronavirus|औरंगाबादच्या सीमा बंद; सहा ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

बोलून बातमी शोधा

Aurangabad lockdown

Coronavirus|औरंगाबादच्या सीमा बंद; सहा ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली कसून सरकारच्या ‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने औरंगाबादमध्ये प्रवेश करणाऱ्या ६ जिल्हा सीमा (बॉर्डर) बंद (सील) करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी त्यासंदर्भात काटेकोरपणे पालन करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली आहे. याशिवाय अत्यावश्‍यक सेवा, आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. राज्य सरकारने आंतरराज्य तसेच जिल्हाबाहेर महत्त्वाच्या कारणांशिवाय जाण्यास बंदी केली आहे.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ६ सीमांच्या तपासणी नाक्यावर २४ तास पोलिसांच्या फौजफाटा तैनात असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या नियमांचा भंग करणाऱ्याविरोधात धडक कारवाई करण्यासाठी पोलीसांचे ६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके जिल्हाभरात मोठी लोकवस्तीचे गावे, बाजारपेठा, चौक, भाजी- फळे मार्केट आदि ठिकाणी गस्त घालणार आहेत.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

८१ हजार रुपयांचा दंड वसूल-

कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात ग्रामीणमध्ये कलम १८८ नुसार १८ गुन्हे दाखल करण्यात आले. विनामास्क फिरणाऱ्याविरोधात नगरपरिषद, ग्रामपंचायत यांच्या संयुक्तरित्या कारवाई करत ४९ हजार २०० रूपये तर मोटर वाहन कायद्यान्वये १३५ वाहनधारकाविरूध्द ३२,२०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.