esakal | Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona Updates in Aurangabad

Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात शुक्रवारी (ता. २३) कोरोनामुळे १७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात बीड- नांदेडमध्ये प्रत्येकी २८, औरंगाबाद २७, लातूर २६, परभणी २५, उस्मानाबाद- जालन्यात प्रत्येकी १६, हिंगोलीतील सात जणांचा समावेश आहे.

दिवसभरात आठ हजार ९३ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी-

औरंगाबाद १४९६, लातूर १४७८, नांदेड १२१०, बीड १२१०, परभणी ९४३, जालना ८०९, उस्मानाबाद ७१९, हिंगोली २२८.

नंदनवन कॉलनीतील पुरुष (वय ६५), सिल्लोड येथील महिला (६२), बजाजनगरातील पुरुष (६५), रामनगरातील महिला (३०), भडकलगेट येथील महिला (४६), बिलोली (ता. वैजापूर) येथील पुरुष (४०), वडगाव कोल्हाटी येथील महिला (९५), खांडी पिंपळगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (७०), नागद (ता. कन्नड) येथील महिला (५०), बोडखा (ता. खुलताबाद) येथील पुरुष (७५), सिडको येथील पुरुष (७६), जगदंबा लॉन परिसर, वैजापूर येथील पुरुष (४०), सिडको एन-तीन येथील पुरुष (६४), बिलोली (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (३५), वसई (ता. सिल्लोड) येथील पुरुष (६३), जटवाडा, हर्सूल येथील महिला (६९),

हेही वाचा: भारूडाला जिवंत ठेवणारा कलावंत काळाच्या पडद्याआड, निरंजन भाकरे यांचे निधन

मोढा बुद्रुक (ता. सिल्लोड) येथील पुरुष (८५), खुलताबाद, मंदी मार्केट येथील महिला (४५), बीड बायपास परिसर येथील पुरुष (५७), हालडा (ता. सिल्लोड) येथील महिला (३०), वांजरगाव (ता. वैजापूर) येथील महिलेचा (५०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगरुळ, (ता. करमाड) येथील महिला (८५), (ता. सोयगाव) येथील महिला (६३), गुरुदत्त नगर, औरंगाबाद येथील पुरुषाचा (६७) जिल्हा सामान्य रुग्णालयात तर गारखेडा येथील महिला (५०), सिल्क मिल कॉलनी येथील पुरुष (४५) रोजाबाग, औरंगाबाद येथील पुरुषाचा (५३) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबादेत १५ हजार जणांवर उपचार-
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात १ हजार ४९६ कोरोनाबाधित आढळले. रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार ९९१ वर पोचली आहे. सध्या एकूण १५ हजार १७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २ हजार ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: उमरग्यात २३ दिवसांत ६१ जणांचा मृत्यु, स्मशानभूमीत जागा पुरेना!

कोरोना मीटर (औरंगाबाद)-
आतापर्यंतचे बाधित ११५९९१
बरे झालेले ९८५१०
उपचार घेणारे १५१७९
आतापर्यंत मृत्यू २३०२