esakal | विद्यापीठाच्या पदवी परीक्षेस आजपासून सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेस आजपासून सुरवात

विद्यापीठाच्या पदवी परीक्षेस आजपासून सुरवात

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर ऑनलाइन होणार आहेत. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल ते २ मे दरम्यान ९९ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १५ एप्रिल ते दोन मे दरम्यानचे पेपर स्थगित करण्यात आले होते. यानंतर गेल्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होऊन येथून पुढील सर्व पेपर ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी कोविडचे नियम पाळून परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: निसर्गाचा निर्दयीपणा! वीज पडून दोघांचा औरंगाबाद तालुक्यात दुर्दैवी मृत्यू

महाविद्यालयात आयटी कोऑर्डिनेटर्सची संख्या दुपटीने वाढविली आहे. पदवीचे उर्वरित पेपर तीन मे पासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पाच मे पासून ऑनलाइन पद्धतीने होईल. संबंधित विद्यार्थ्यांनी २८ एप्रिल ते दोन मे दरम्यान ऑनलाइन मॉक टेस्ट दिली. पहिल्या दिवशी ६५ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी तर रविवारी सायंकाळपर्यंत ९९ हजार ३१९ जणांनी ही टेस्ट दिली. मॉक टेस्टदरम्यान विद्यार्थ्यांची एकही लेखी तक्रार परीक्षा विभागास प्राप्त झाली नसल्याचा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. काही अडचण आल्यास आपल्या महाविद्यालयाच्या ‘आयटी कोऑर्डिनेटरशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे.

loading image