esakal | कोरोनाने कांतीलाल गुजर यांचे निधन, पीपीई किट घालून शेतातच अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षावर होणार 'हा' मोठा परिणाम...!
कोरोनाने कांतीलाल गुजर यांचे निधन, पीपीई किट घालून शेतातच अंत्यसंस्कार
sakal_logo
By
दीपक देशमुख

चिंचोली लिंबाजी (जि.औरंगाबाद) : चिंचोली लिंबाजी (ता.कन्नड) येथून जवळ असलेल्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील गौताळा अभयारण्यालगत असलेल्या तळनेर येथील कांतीलाल भगवान गुजर (वय ४७) यांचे करोना संसर्गाने गुरुवारी (ता.२९) पहाटे निधन झाले. या बाबत माहिती अशी की, तळनेर येथील कांतीलाल गुजर यांना मागच्या दहा बारा दिवसांपूर्वी करोना या आजाराने ग्रासले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटूंबायांनी त्यांना पाचोरा (जि.जळगाव) येथील एक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू मी येथे राहत नाही मला घरी घेऊन चला नाही तर मी दवाखान्यावरुन उडी मारील, अशी कांतीलाल याने धमकी दिल्याने त्यांच्या कुटुंबायांनी त्यास गावी परत घेऊन शेतातच एका आंब्याच्या झाडाखाली त्यांची व्यवस्था करुन दिली.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

मात्र येथे योग्य तो उपचार मिळाला नसल्याने कांतीलाल यांचे गुरुवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान निधन झाले. सकाळी आंब्याच्या झाडाखाली रुग्णांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून ही बाब घरच्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने आसपासचे नागरिक जमा होऊन भितीपोटी दुरवरच थांबले. या घटनेबाबत घाटशेंद्रा येथील उपसरपंच समाधान गायकवाड यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांच्या प्रयत्नाने चिंचोली लिंबाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातून पीपीई किट उपलब्ध केले. ती परिधान करून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करुन योग्य काळजीपूर्वक कांतीलाल गुजर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.