esakal | पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

बोलून बातमी शोधा

pankaja munde
पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे मुंबईला गेल्यानंतर त्या अलगीकरनात आहेत.

पंकजा मुंडे यांनीच सोशल मीडियावरून ही माहिती दिली-

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्यावर मोठा प्रभाव पडला आहे. पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे या विषयावर सक्रिय असून डॉ. मुंडे यांनी जिल्ह्याचा दौरा करून रुग्णालये, कोविड केअर सेंटरला भेटी देऊन पाहणी केली व माहिती घेतली. तसेच उपाय योजनांतील त्रुटी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या. तर, पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील रेमडेसिव्हीर काळ्याबाजाराबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले.

सोशल मीडियावरून माहिती

परळी, शिरूर कासार व बीड येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत त्यांनी भाजप नेत्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. दरम्यान, त्यांच्या अंगरक्षकाच्या निधनानंतर त्यांनी जिल्हा दौरा केला होता. मागच्या पाच दिवसांपासून अलगिकरनात असलेल्या पंकजा मुंडे यांचा कोरोना अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे