esakal | मेडिकलमध्ये औषधांशिवाय इतर साहित्य विकल्यास होणार कारवाई

बोलून बातमी शोधा

medical shop
मेडिकलमध्ये औषधांशिवाय इतर साहित्य विकल्यास होणार कारवाई
sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी कोविड निरीक्षक, परीक्षकांनी कामे करावे. औषधांशिवाय इतर साहित्य विकणाऱ्या मेडिकल दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली (ता. २२) कोरोना नियमांच्या अंमलबजावणीसाठी वार्ड निहाय निवडलेल्‍या कोविड निरिक्षकांची व कोविड परीक्षकांची आढावा बैठक झाली. अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, संजय जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, मंदार वैद्य, डॉ. नीता पाडळकर, पूजा पाटील, आर. आर. रोडगे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी औषधांशिवाय इतर साहित्य विकणाऱ्या मेडिकल्सवर कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा: Corona Vaccine: मराठवाड्यात लसींचा तुटवडा; औरंगाबादेत सोमवारपर्यंत प्रतीक्षा

मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लसीकरणाचा वेग वाढवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. तसेच ब्रेक द चेन नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ११५ टीम कार्यरत असून भाजीमंडई, दुकाने, नाश्ता सेंटर, ज्यूस, हॉटेल, परमिट रूम, बार, पेट्रोल पंप, धार्मिक स्थळे, वाहतूक सुविधा या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे. गावा गावात तरुणांच्या बैठका घेऊन त्यांना कोरोना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यावे 'आपल्यासारखे समाजसेवक दुसरे कुणीच नाही' हे समजून झोकून देऊन काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी लसीकरण, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, हॉस्पिटल्स, बेड आणि कोरोना नियमांचे पालन इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला.