esakal | सर ! माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू?
sakal

बोलून बातमी शोधा

गेल्या 24 तासात आजरा तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सर ! माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू?

sakal_logo
By
सुनील इंगळे

औरंगाबाद : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या वॉर रूममध्ये दररोज दहाहून अधिक नागरिक फोन करून कोरोना संदर्भात विचारणा करत आहेत. यात सर! माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, काय करू? कोठे बेड रिकामे आहेत. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेडची माहिता हवी आहे, अशी विचारणा करण्यात येत असून वॉर रूममधील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. महिन्याभरापूर्वी जिल्‍हा परिषद विभागाच्यावतीने कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. ०-२४०-२९५४६१ या क्रमांकावर दररोज ग्रामीण भागातून नागरिक कोरोनासंदर्भात विविध माहितीसाठी फोन करत आहेत.

हेही वाचा: सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

यात जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटर्स सद्य:स्थिती, दाखल रुग्ण, उपलब्ध खाटा तसेत ग्रामपंचायत, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका स्तरावरील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. या वॉर रूमध्ये साथरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री लहाने, डॉ. जी. एम. कुडलीकर, डॉ. बारडकर यांच्यासोबत नऊ डाटा एंट्री ऑपरेटर, सांख्यिकी सहायक, डाटा मॅनेजर असे ११ कर्मचारी २४ तास काम पाहत आहेत. दरम्यान, कोरोनाचा केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध स्तरावर आढावा घेतला जातो. त्यामध्ये वॉररूम मधील माहितीवरच हा आढावा अवलंबून असतो. परंतू, ग्रामीण भागातून येणाऱ्या फोनची वॉर रूममध्ये नोंद होत नसल्यामुळे आतापर्यंत किती फोन आले व कोणत्या ठिकाणी कोणत्या आरोग्य व्यवस्थेची जास्त गरज आहे, या परिस्थितीचा अंदाज घेणे शक्य नाही. यामुळे जर ग्रामीण भागातून आलेल्या फोनची नोंद ठेवली तर त्याठिकाणी तात्काळ उपाययोजना केल्या जाऊ शकतात.

loading image