esakal | सुखद! सात महिन्यांच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : लॉकडाउनच्या स्थितीमुळे पुण्यात कामाला असलेले एक कुटुंब गावाकडे परतत असताना उमरग्यात कुटुंबकर्त्याला अस्वस्थ वाटु लागल्याने चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला. सोबत असलेल्या सात महिन्यांच्या बाळासह दोन मुलींचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. द्विधा मनस्थितीत असलेल्या पत्नीचा अहवाल मात्र निगेटिव्ह होता. तिने तीन पोटच्या गोळ्याची ईदगाह कोविड केअर सेंटरमध्ये देखभाल केली. पती सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते. योग्य उपचारानंतर कोरोनावर मात करत दहाव्या दिवशी वडील आणि तीनही मुले अंबुलगा (ता. निलंगा) मूळगावाकडे परतले.

हेही वाचा: ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ

निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील सोमनाथ सोनकिडे हे कामानिमित्त पत्नी व तीन मुलासह पुण्यात रहात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउन जाहीर होणार असल्याने श्री. सोनकिडे कुटुंबासह पुण्याहून गावाकडे निघाले होते. ता. १४ एप्रिलला सायंकाळी ते उमरग्यात आले. त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात केलेल्या चाचणीत ते पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू झाले. ता.१५ एप्रिलला सकाळी सात महिन्याचा समर्थ, तीन वर्षांची जान्हवी व सात वर्षांची श्रावणी चाचणीत पॉझिटिव्ह आली. आईचा अहवाल मात्र निगेटिव्ह होता. आई लेकरांसमवेत शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये राहिली. मुलांना योग्य वेळी आहार व औषधी दिली. पोटच्या गोळ्यासाठी मातृत्व प्रेम महान असते. हे आई पुजाने केलेल्या धैर्यातुन दिसून येते. दरम्यान श्री. सोनकिडे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन परत ईदगाह कोविड सेंटरमध्ये आले. तेथे ते पत्नी, मुलासोबत राहिले. तब्येत सुधारल्याने शनिवारी (ता.२४) गावाकडे परतले.

हेही वाचा: 'रेमडेसिवीर'चा तुटवडा भासणार नाही, ऑक्सिजन प्लँट उभारणार: शंकरराव गडाख

स्वतःचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात होतो. दुसऱ्या दिवशी तीनही मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वाढली. पण धाडसाने उपचार घेत होतो. पत्नीनेही धीर दिला आणि तिने  मुलांची काळजी घेतली. तब्येत सुधारल्याने गावाकडे परतलो. उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ईदगाह कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी व स्वंयसेवकांनी केलेली मदत स्मरणात राहणारी आहे.

- सोमनाथ सोनकिडे, अंबुलगा

loading image
go to top