esakal | सलून सुरु केल्याने पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad crime news

सलून सुरु केल्याने पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: कोरोनामुळे जिल्ह्यातील सामान्यांची परिस्थिती भयानक होत आहे. अशात शासनाच्या आदेशामुळे व्यापारी, दुकानदार आणि इतर लोकांना त्यांची दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. शहरात सगळीकडे दुकाने बंद आहेत. या काळात उस्मानपूरा भागातील एक सलून दुकान सुरू असल्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली.

कारवाईनंतर सलून चालकाला पोलिस स्टेशनला घेऊन जाताना त्याचा त्यातच मृत्यू झाला. यानंतर सलून चालकाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. कारवाई केलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती आणि उस्मानपूरा पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरात ब्रेक दि चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता बाकीचे दुकाने उघडण्यास बंदी आहे. फिरोज खान याचे उस्मानपुरा भागात सलूनचे दुकान आहे. परवानगी नसताना फिरोज खान यांनी सलून दुकान उघडले होते. त्यानंतर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिरोज खान याच्यावर पोलिसांनी कारवाई केली होती आणि खानला ताब्यात घेतले होते.