कांद्याला भाव मिळेना! शेतकरी झाला हाताश

पण या वर्षीतरी भाव भेटेल म्हणून मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा मोठ्या जोमाने कांदे लावले.
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : घराजवळ साठवून ठेवलेला कांदा.(छायाचित्र : गजानन आवारे)
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : घराजवळ साठवून ठेवलेला कांदा.(छायाचित्र : गजानन आवारे)
Updated on

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : शेतकऱ्यांनी (Farmer) शेतात मेहनत करून कांद्याची लागवड (Onion Cultivation) केली. परंतु चांगल्याप्रकारे आलेल्या कांद्याला भाव (Onion Price) मिळत नसल्यामुळे शेतकरी कांदा साठवून भाव वाढण्याची वाट पाहत असल्याचे चित्र सध्या जायकवाडी (ता.पैठण) (Jayakwadi) परिसरात दिसून येत आहे. शेतकरी वर्षभर मेहनत करून व शेजाऱ्याकडून पाणी घेऊन रात्र रात्र जागून पाणी देऊन कांदे शेतात पिकवायचे. त्यातच डुकरांच्या त्रासाला कंटाळून कुंपण शेताला करायचे आणि सरते शेवटी विकायची वेळ आली की भाव मिळत नाही. म्हणून कांदा रस्त्यावर फेकायचा. कांद्याने शेतकऱ्यांना नेहमीच मेटाकुटीला आणलेले आहे. पण या वर्षीतरी भाव भेटेल म्हणून मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा मोठ्या जोमाने कांदे लावले. परंतु भाव नसल्यामुळे शेतकरी सध्या हाताश झालेला आहे. त्यामुळे लवकरच कांद्याला भाव मिळेल या आशेवर शेतकरी राजा बसला आहे. (Aurangabad Latest News Onion Price Come Down, Farmers In Trouble Paithan Block)

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : घराजवळ साठवून ठेवलेला कांदा.(छायाचित्र : गजानन आवारे)
करणी-भानामतीच्या नावाखाली महिलेची फसवणूक, भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

मागील वर्षी कोविडमुळे शेतमालाला भाव मिळाला नाही. त्यातच यावर्षी सुद्धा तिच परिस्थिती असल्याने आम्ही शेतात अहोरात्र मेहनत करून कांदा पिकावला. परंतु त्याला सध्या योग्य भाव नसल्यामुळे आम्ही तो कांदा चाळीमध्ये, तर काहींनी घरासमोर ढिगारे करून तो साठवून ठेवला आहे. लवकर भाव वाढला नाही व तो कांदा तसाच राहून सडला, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना कांद्याचा भाव मिळावा. यासाठी जो आवाज उठवेल त्यालाच मी मतदान करेल.

- स्वामी बोबडे, युवा शेतकरी, ईसारवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Ravikant Tupkar Slams Government Over Farmer Distress
Marathi News Esakal
www.esakal.com