esakal | रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावपळ थांबेना, १०३ रुग्णालयांसाठी फक्त ७०४ इंजेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir 2.jpeg

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावपळ थांबेना, १०३ रुग्णालयांसाठी फक्त ७०४ इंजेक्शन

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे (Corona Infection) गंभीर झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी (Remdesivir Injection) धावपळ सुरूच आहे. कारण मागणीप्रमाणे अद्याप इंजेक्शन मिळत नाहीत. बुधवारी (ता. पाच) १०३ रुग्णालयांसाठी ७०४ इंजेक्शन वाटप करण्यात आले. उपचार सुरू असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या पाहता आठ हजार ९२५ इंजेक्शनची गरज आहे. कोरोनाबाधित (Corona Positive) गंभीर रुग्णांमुळे या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. तुटवडा असल्याने काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली या इंजेक्शनचे वाटप केले जात आहे. सध्या १०३ खासगी रुग्णालयात २८४५ (Private Hospital) रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (Aurangabad Latest News Remdesivir Injection Shortages In City)

हेही वाचा: हृदयद्रावक! वीज कोसळून १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करूण अंत

त्यातील ३०२ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत तर एक हजार १६ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. त्यानुसार १,७८५ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याची नोंदणी खाजगी रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली होती. पाच दिवसांत सहा इंजेक्शन एका रुग्णाला देण्यात येत आहेत. त्यानुसार १७८५ रुग्णांना आठ हजार ९२५ इंजेक्शनची गरज असताना फक्त ७०४ इंजेक्शन देण्यात आले आहेत. वितरक असलेल्या एजन्सीमार्फत ते खाजगी रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मागणी व वाटप करण्यात आलेल्या इंजेक्शनच्या आकड्यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचाही जीव इंजेक्शनचा शोध घेताना कासावीस होत आहे.